HW News Marathi
महाराष्ट्र

तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी, वीज बिलावरून मनसे आक्रमक

मुंबई | कोरोना काळातील वीजबिलांच्या माफीबाबत सध्या मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले आहेत.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने आज सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यामध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास मनसेकडून शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं. याच पार्श्वभूमीवर शनिवार वाडा परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त टेवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.

ठाण्यातही मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात कायम असल्याने ठाणे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश कायम ठेवला. या आदेशानुसार पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या असून त्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही आज ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये म्हणजेच अविनाश जाधव यांच्या नौपाड्यातील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

नवी मुंबईमध्ये बेलापूर, ऐरोलीमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग नोंदवला. बेलापूरमध्ये कोकण भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. नाशिकमध्ये राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मनसेने काढला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

औरंगाबादमध्येही मनसेच्या वीजबीलवाढीविरोधातील मोर्चाला शेकडोच्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर मोर्चा पांगला. मात्र नंतर पुन्हा मोर्चा सुरु झाला. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड सुरु केली. मात्र मनसेचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे दिसून आलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांना अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली

News Desk

कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे! । आशिष शेलार

News Desk

भाजपला आता ‘जय’ चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची टोलेबाजी

News Desk