HW News Marathi
Covid-19

Hw Exclusve | वाईन शॉपच्या राज ठाकरेंच्या मागणीवर मनसे नेते काय म्हणाले?

रसिका शिंदे | राज्याची आर्थिक स्थिती सध्या कोरोनामूळे ढासळली आहे.ती कशी स्थिर स्तावर करायची यासाठी सगळ्या स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत. अशातच राज्यातील वाईन शॉप सुरु करावी अशी मागणी होत होतीच.काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रकार परिषदेत वाईन शॉप सुरु करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी जर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर विचार केला जाऊ शकतो असे संकेतही दिले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे वाईन शॉप सुरु करावी अशी मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी छोटे हॉटेल्स आणि खानावळी सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की या खानावळीत मिळणाऱ्या जेवणावरही अनेक मुंबईतले लोकं अवलंबून आहेत. त्यामूळे सोशल डिस्टन्स ठेवून होटेल्स सुरु करावी असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

होटेल्स सोबतच वाईन शॉप सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘वाईन शॉप्स’ सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे असं त्यांनी म्हटलंय. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावला आहे आणि गमावू ह्याचा अंदाज येईल, असं राज ठाकरेंनी या पत्रात सांगितले आहे. दरम्यान, याच मुद्दावर आम्ही मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्याशी बातचीत केली त्यांनी काय म्हटलंय पाहूयात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा तर दुसरीकडे भाजप कार्यालयात मिळाले ५००० डोस

News Desk

महाराष्ट्र शोकमग्न आहे! । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

swarit