HW News Marathi
महाराष्ट्र

मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे | अजित पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र बेडे नेते नेहमीच एकमेंकावर टीकास्त्र सोडतात. परंतु “आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे,” अशी ऑफर अजित पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखती दरम्यान पवार असे देखील म्हणाले की, राजू शेट्टींचे मतभेदही दूर केले जातील.

“लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आले पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंनी भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची पुण्यात घेतलेले मुलाखत आणि यानंतर या दोघांची विमानात झालेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांना मनसेला ऑफर देऊन अजित पवारांनी शिक्कामोर्तब केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार

News Desk