HW News Marathi
महाराष्ट्र

“लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही”, मनसे नेत्यांचा सरकारला टोला

मुंबई | राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं अजूनही सुरु केलेली नाहीत. मात्र काल(३१ ऑगस्ट) एक आश्चर्य करणारा विडिओ समोर आला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर आता मनसेने यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल

“कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल,” असं मनसेने म्हटलं आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर हे कोणाच्या आदेशाने करतात याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

मंगळवारी मुंबई पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करोना निर्बंधांच्या आड सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध जपणारी आणि सर्वसामान्यांच्या त्रासात विनाकारण भर घालणारी दुटप्पी धोरणं सरकार आखत असल्याची टीका केली होती. तसेच “सर्व मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. अन्यथा, मंदिरांबाहेर आम्ही घंटानाद करू,” असं म्हटलं होतं. याचाच संदर्भ लोकसत्ता डॉट कॉमच्या व्हिडीओशी जोडून मनसेने व्हिआयपींना परवानगी दिली जाते याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल, असं मनसेनं म्हटलं आहे.

लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. “घंटानाद करा किंवा आणखी कुठला नाद करा, पण आमचा नाद करू नका’ असं म्हणणाऱ्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे दात त्यांच्याच- शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे यांच्या पराक्रमाने- घशात अडकले आहेत. खासदार शेवाळे, सेलिब्रिटी निर्माती एकता कपूर यांसारख्या व्हीआयपींना सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मागच्या दाराने प्रवेश देणारे न्यासाचे अध्यक्ष श्री. भावोजी बांदेकर हा प्रकार शिवसेनापक्षप्रमुख- मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या ‘आदेशा’ने करतात का, याचीही चौकशी व्हायला हवी. लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही,” असं फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लपून छपून काही होणार नाही, जे होईल ते समोरासमोर’, बाळा नांदगावकरांची माहिती

Jui Jadhav

हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेल!;, शेलारांची बोचरी टीका

News Desk

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

News Desk