HW News Marathi
महाराष्ट्र

‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू’, प्रविण गायकवाडांना मनसेचा थेट इशारा!

पुणे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली होती. गायकवाड यांच्या ह्या टीकेमुळे मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा सजज्ड दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना दिला आहे.

मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय

पुण्यात वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण गायकवाड यांनी चांगलंच खडसावल्याचं पाहायला मिळाल आहे.तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देतानाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही आता वसंत मोरे केली आहे.

राज ठाकरेंवर टीका

प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या

पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

News Desk

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Aprna

‘रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट’, रेल्वे मंत्री वैष्णव यांची घोषणा

News Desk