HW News Marathi
महाराष्ट्र

‘रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट’, रेल्वे मंत्री वैष्णव यांची घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यावर सगळ्या मंत्र्यांनी पदभार काल (८ जुलै) स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांची बैठक घेतली व मोठे निर्णय या बैठकीत घेतले गेले. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आता रात्री १२ वाजेपर्यंत काम करताना दिसणार आहेत. मात्र, हा आदेश केवळ मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळात बदल

मंत्रिमंडळाच्या काल (८ जुलै) झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांची पहिली शिफ्ट ही सकाळी ७ वाजता सुरू होईल. ही शिफ्ट दुपारी ४ वाजता संपेल. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजता संपेल. हा आदेश केवळ एमआर सेलला लागू राहणार आहे. सर्व रेल्वे कर्मचारी किंवा खासगी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजीपीआर डीजे नारायण यांनी दिली.

नरेंद्र मोदींचा रेल्वेवर संपूर्ण फोकस

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित सर्व कार्यालयांना हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्याने दिले आहेत. त्यानुसार केवळ रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, असं नारायण यांनी सांगितलं.मिशन मोडसाठी रेल्वेसाठी बरंच काही करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. एमआर सेलचा अर्थ मंत्र्याचं कार्यालय. त्यामुळे हा आदेश केवळ या कार्यालयासाठी लागू असेल, असंही ते म्हणाले. भारतीय रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाचा एक भाग आहे. रेल्वेवर मोदींचा फोकस असून त्यावर त्याबाबतची त्यांची काही स्वप्ने आहेत, ती सत्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे, असं वैष्णव म्हणाले.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नव्या वेळा

– कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील

– सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत पहिली शिफ्ट

– दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत दुसरी शिफ्ट

– रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंध्रा प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध  

News Desk

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

News Desk

आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले! -नाना पटोले

News Desk