HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

कराड | राजकारणात सध्या अनेक विषयांवरुन गदारोळ सुरु आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. अशात काही नेते मंडळी इतर नेत्यांच्या गाठीभेटी करताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल (१ जून) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्यानतंर आज (२ जून) हर्षवर्धन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. कराड येथे चव्हाणांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्याने कॉंग्रेस नेत्याची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नेमकी या २ नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे समजले नाही आहे.

भेटींचं सत्र सुरुच!

तसेच, गेले अनेक दिवस काही नेते काही नेत्यांच्या भेटी घेत असल्यामुळे चर्चा सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर जळगावात जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी जात रक्षा खडसे यांची भेट घेतली होती. तर आज एकनाथ खडसे या्ंनी शरद पवारांची भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमडी-एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या अमित ठाकरेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk

लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही !

News Desk