HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राममंदिर भूमीपूजनाचं निमंत्रण नाही,फक्त ‘या’मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्या | राममंदिर भूमिपूजन येत्या ५ ॲागस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. राममंदिर भूमिपूजनाला सर्व धर्मीय लोक उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निमंत्रितांच्या यादीत समावेश नाही.या यादीमध्ये केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या देशातील एकमेव मुख्यमंत्र्यांना निमंत्रण आहे.

खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भूमिपूजनाला जाण्यासाठी कोणत्या निमंत्रणाची गरज नाही असे म्हटले होते. तरीही उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी राममंदिर निर्मितीसाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे या भूमिपूजनला उद्धव ठाकरे यांना मोदी सरकारकडून निमंत्रण अशी अपेक्षा होती.

Related posts

नोकरशहा महाविकसआघाडीत भांडणे लावत आहेत | अशोक चव्हाण

News Desk

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

News Desk

कोरोनापासून वाचण्यासाठी गोवा पॅटर्न अवलंबावा

News Desk