HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिरसाठी ‘ट्रस्ट’ची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे अभिनंदन

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकर सुरू करणार असल्याचे आज (५ फेब्रुवार) लोकसभेत सांगितले. मोदी लोकसभेत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींचे अभिनंदन केल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान मोदी म्हणाले, राम जन्मभूमीच्या आणि राज मंदिर निर्मितीच्या विषयावर मी बोलत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला ६७ एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली. तर ६ एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डालाही देणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठमोळ्या प्रणय पाटोळे इलॉन मस्कचा ट्वीटर मित्र; थेट अमेरिकेत जाऊन घेतली भेट

Aprna

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

लोकलचा प्रवास सुखकारक, दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर

News Desk