HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत मोर्चा काढायला हवा !

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. एकीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती याबाबत आपली भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून वारंवार जुंपत आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींपर्यंत देखील हा विषय पोहोचवण्यात आला आहे. आता ह्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षण प्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींकडे हात जोडून विनंती केली आहे. आता त्यावर पंतप्रधान निर्णय घेतील”,असे संजय राऊत म्हणाले. ते आज (१३ जून) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. आता ते पुढील निर्णय घेतील. या प्रश्नी जर मोर्चा निघणार असेल तर तो दिल्लीत काढायला हवा. महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये”, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

News Desk

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्न करण्यास बंदी

News Desk

पॉंडिचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत ठरले अपयशी

News Desk