HW News Marathi
Covid-19

सौम्य लक्षण असलेल्यांकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता !

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. “कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सौम्य लक्षण असलेल्यांकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते. कोरोनाशी लढा देत असताना कोरोनापासून दूर राहणे गरजेचे आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. सौम्य लक्षणांकडे रुग्णांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे आॅनलाइन लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. “सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण सापडत होते तेव्हा राज्यात केवळ कोरोनाच्या २ टेस्टिंग लॅब होत्या. मात्र, आता गेल्या ४ महिन्यांत राज्यभरातील टेस्टिंग लॅबची संख्या २८५ इतकी झाली आहे”, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जॉन्सन कंपनीच्या ‘सिंगल डोस’ लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार!

News Desk

राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत

News Desk

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण   

News Desk