मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. राज्याबाबत आज (१८ मार्च) मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल 25 हजार 833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे.
राज्यात आज 25833 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 12764 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2175565 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 166353 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.79% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2021
राज्याच्या कोरोनास्थितीबाबत जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एक दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत राज्यात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर चिंताजनक गोष्ट अशी की, याच एक दिवसात राज्यात 58 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.