HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यात आज तब्बल ३२ हजारांहून अधिक जण ‘कोरोनामुक्त’

मुंबई । महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे मोठया प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२१ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ७३८ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल ३२ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बाब अशी की राज्यात आतापर्यंत एकूण तब्बल ९लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून आपल्या घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यात एकूण २लाख ७४ हजार ६२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट ७४.८४ % इतका आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही आकडेवारी जाहीर केली आहे.

 

Related posts

मुंबईत भाजप सेनेच्या पाठिशी : मुख्यमंत्री

News Desk

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार

News Desk

राज्यसभेसाठी नोटाचा वापर करता येणार

News Desk