मुंबई । महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहता राज्य सरकारला कठोर निर्णय घेणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आज (२५ मार्च) तब्बल ३५ हजार ९५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. फक्त २४ तासांमध्ये आलेला राज्यातला हा आकडा शासन-प्रशासनाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढवणारा आहे.
राज्यात आज 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2283037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 262685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 25, 2021
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काहीच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितल्याप्रमाणे राज्यातील आकडा सातत्याने वाढतच राहिला तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मुख्य शहरांमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान,आज जारी झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज २० हजार ४४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ६३ हजार ६८५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनारुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट होऊन हे प्रमाण ८७.७८% झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.