मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांबाबत आज (२६ मार्च) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आज 36 हजार 902 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तुलनेने राज्यातील हा आकडा फार मोठा असून शासन-प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
राज्यात आज 36,902 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17019 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2300056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 282451 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2%झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2021
अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज नवीन 17 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचा एकूण 2 लाख 82 हजार 451 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2% इतके झाले आहे. दरम्यान, या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रविवारपासून (२८मार्च) राज्यात नाईट कर्फ्यु लागू केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.