HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच राज्य सरकारकडून आज (२४ फेब्रुवारी) जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीमुळे सरकारच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. राज्यात आज ८ हजार ८०७ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांतील हा मोठा आकडा असल्याने शासन-प्रशासनासह नागरिकांना अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, या सगळ्यात राज्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत नव्या २ हजार ७७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण २० लाख ८ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण ५९ हजार ३५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७०% झाले आहे.

Related posts

अकबर हा महिलांच्या वेशात मीनाबाजारात जाऊन महिलांची छेड काढायचा !

News Desk

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पाकला धमकी

News Desk

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

News Desk