HW News Marathi
महाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा बुडून मृत्यू

तुळजापूर तालूक्यातील तडवळा शिवारात विहिरीत पकडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या मातेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रहिवारी सकाळी घडली आहे. राधाबाई पुंडलीक मेथे (३६) असे महिलेचे नाव आहे.

नांदेड जिल्ह्यातील तादळी येथील राधाबाई पुंडलिक मेथे या ऊसतोड कामगार असून, तुळजापूर तालुक्यातील तडवळा शिवारात विजयकुमार कुलकर्णी यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी आल्या होत्या. रविवारी सकाळी त्या त्यांचा १३ वर्षीय मुलगा बालाजी यास घेऊन शेतातील विहिरीजवळ धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बालाजी हा विहिरीच्या कडेला अंघोळ करत असताना तोल जावून बालाजी विहिरीत पडल्यानेतो बुडू लागला. हे पाहून राधाबाई त्याला वाचविण्यासाठी विहिरीकडे गेल्या. त्यांनी मुलाला कसेबसे वाचविले, मात्र त्या स्वत: पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा बुडू लागल्या. आई पाण्यात बुडत असल्याचे पाहुन बालाजीने अरडाओरडा केला जवळ असलेल्या नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ,त्यांनी महिलेला विहिरीतून बाहेर काढले मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला होता. लोकांनी पोलिसांनी दिली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री? मोदी, शहा जोडी कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब!

News Desk

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती

News Desk