HW News Marathi
महाराष्ट्र

स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा !

बीड | स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असे म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघे २४ तास शिल्लक असताना महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उटले आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणाबद्दल बोलना पंकजा मुंडे यांना अंतिम प्रचार सभेत भुवळ आली होती. यानंतर तब्बल २० तासानंतर पंकजा मुंडे या जनतेसमोर आल्या. पंकजा मुंडे यांच्या समर्थक महिलांनी आज (२० ऑक्टोबर) त्यांच्या निवासस्थान जावून त्याची भेट घेतली. पंकजा मुंडेंना सर्व स्थानिक महिलांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आज असते, तर असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती, असे मत व्यक्त केले. स्वतःचा रक्ताचा भाव जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असेही प्रीतम मुंडे यांनी नमूद केले. “पंकजा मुंडेंनी बीडच्या विकासासाठी काम केले ही त्यांची चूक झाली का? ऐकवत नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी बोलले गेले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांच्याविरोधात कारस्थान झाले, तेव्हा तेव्हा त्या खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केलं तरी त्या खचत कसे नाही हीच त्यांची पोटदुखी आहे.” तसेच धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ परळीमध्ये रॅली काढण्या आली आहे. मला जग सोडून जावे असे वाटते.

बहीण-भावाच्या नात्यात विष कालवतात | धनंजय मुंडे

धनंजय मुंडेला संपविणयाचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (२० ऑक्टोबर) घेतलेल्य पत्रकार परिषदेत केला आहे. बहिण भावाच्या नात्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांनी कुणी हे विष पेरण्याचा प्रयत्न केला त्याला जनता न्याय देईल, असे म्हणत मुंडे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या विरोधात व्हायरल होत असलेला व्हिडीओ बनावटी असून ती क्लिप एडिट करून व्हायरल केली आहे. व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. तसेच ही व्हिडिओ कल्पी फॅरेन्सिक लॅबला पाठवा आणि त्यांची चौकशी करा, असे आवान देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माशा मारण्याची स्पर्धा दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

News Desk

ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड

News Desk

एल्गार परिषदेतील सत्य बाहेर येण्याच्या भीतीने सरकारने उचलले हे पाऊल

swarit