HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा मला आनंदच खासदार सुप्रिया सुळेचं वक्तव्य!

नागपूर। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आता उत्तर दिले आहे. ईडीचा राष्ट्रवादीला नेहमीच फायदा झाला आहे. त्यामुळे त्याचे स्वागत आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचेवळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, यावर विचारले असता वेधल्यानंतर त्या म्हणाल्या, मला भेटीचा आनंदच आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे यांना देखिल उत्तर दिलं आहे.

ईडीचा नेहमीच फायदा झाला आहे

भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांचे स्वागत केले आहे. ईडीच्या कारवाईचे मी मनापासून स्वागत करते. राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झाला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपला चिमटा काढला. त्यानंतर त्यानी महाविकास आघाडीबाबत भाष्य केले. महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण 25 वर्षे या राज्याची सेवा करेल, असे त्या म्हणाल्या.

माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही

मी इतके इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोलले तर मी थोडासावेळ विचार करते. माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझे आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचे मनापासून स्वागत करायला हवे. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

मी काही दिल्लीला गेलेले नाही मला फारसं माहिती नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुटका या प्रकरणासंदर्भात विचारताना पत्रकारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना झालेली अटक आणि नंतर होणारी वक्तव्य पाहाता कुठेतरी मोदी सरकारचा दबाव राज्यावर आहे असं वाटतं का असा प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सुळे यांनी अगदी मोजक्या शब्दात आणि सावध प्रतिक्रिया नोंदवली. “मी काही दिल्लीला गेलेले नाही मला फारसं माहिती नाही,” असं सुप्रिया सुळे या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. नंतर परत एका पत्रकाराने राणे प्रकरणावरुन सुरु असणाऱ्या राजकारणावर तुमचं काय मत आहे असं विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी, “मला याबद्दल काहीही माहिती नाही,” असं म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असणार मराठी

News Desk

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?

News Desk