HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांसबोत महत्त्वपूर्ण बैठक सुरू, पुढील रणनीती ठरणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ५४ आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक बोलविण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनच्या नव्या समीकरणावर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे.

दरम्यान, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला, तर ५ वर्ष उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहणार का?, महामंडळासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप यावर या तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहेत. तसेच सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी १४ मंत्रिपदे यावर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

तसेच स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठविण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी पुढील रणनीती ठरणार असल्याचे माहिती शक्यता वर्तवली जाते. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यासाठी उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या सभेला कलम १४४ लावणार का? ओवेसींचा सरकारला सवाल

News Desk

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त! – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

Aprna

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान!

News Desk