मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सगळ्याच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तशीच MPSCच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. त्यानंतर राज्य शासनाने परीक्षा ९ एप्रिल रोजी पुढे ढकलली होती. दरम्यान, ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात एक परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिचाचे राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
काय आहे नवीन वेळापत्रक?
एमपीएससीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलंय की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ९ एप्रिल, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात ४ येईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.