HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या 

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज (२६ ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यानुसार ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार होती. त्यातही बदल करत २० सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आकडेवारीवरुन सेना-भाजपमध्ये आगपाखड

News Desk

मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता – संभाजीराजे

News Desk

“परमबीर सिंह-सचिन वाझेंची भेट नियमबाह्य, पोलिसांकडून होणार चौकशी!” – गृहमंत्री

News Desk