HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परीक्षेची नवी तारीख ठरल्यानंतर सरकारमधील ‘या’ नेत्याने केली नवी मागणी

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरम्यान, काल परीक्षा पुढे ढकलल्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधीलच काही नेत्यांनी निषेध केलो होता. यात कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला होता. दरम्यान, आता या दोन्ही नेत्यांनी २१ मार्चला परीक्षा होणार हे जाहीर केल्यानंतर सरकारचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे MPSC परीक्षा २१ मार्च रोजी निश्चित करण्यात आलीय. हे आठ दिवस अधिकच्या अभ्यासाला मिळाल्याने युवांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तसंच परीक्षेला जाताना कोरोनासंदर्भात स्वतःची संपूर्ण काळजी घ्यावी. सर्वांना माझ्या शुभेच्छा!’.

तर कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी २१ मार्चला MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तसेच, ‘सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. इतकंच नाही त २१ मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna

सरसंघचालक मोहन भागवतांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत ?

News Desk

भास्कर जाधवांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया..!

News Desk