HW News Marathi
महाराष्ट्र

राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं; वाईन विक्रीवरून पडळणकरांचा हल्लाबोल

मुंबई | “जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे,” असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप  या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय गुरुवारी (२७ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टीकास्त्र सुरू आहे. 

पडळकर म्हणाले, “जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे तुम्ही नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. टक्केवारीसाठी वाई ही दारू नव्हे, असे संशोधन करणाऱ्याचा मी जाहीरपणे निषेद करतो.” 

“मा.शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत, असे पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार ‘ब्लॅक लिस्टेट’ कंपन्यांना परीक्षांचे दिले कंत्राटे, पडळकरांचा आरोप

News Desk

“शिवसेनेत असताना गडकरींना माहित न्हवतं का?”, नाना पटोलेंचा गडकरींना सवाल

News Desk

बुलढाण्यात मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk