HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांचे नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहील; भाजप आमदाराचा टोला

मुंबई | जनाब संजय राऊत, तुमचे इतिहासातले नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिले, कारण आपल्या सारखा ‘खुशामतगिर’ परत होणे नाही, अशा शब्दात भाजपच्या आमदार राम कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. कदाचित, त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेले सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचे भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे,” असे ते म्हणाले.

“महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु, या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतो. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेले तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात,” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये कोणताही गट नाही- खासदार प्रतापराव जाधव

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत येणारे कल्याणराव काळे आहेत कोण?

News Desk

“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?” देशमुख प्रकरणावरून राऊतांचा सवाल!

News Desk