HW News Marathi
महाराष्ट्र

शिवस्मारकाच्या बांधकामाला २४ ऑक्टोबरचा मुहूर्त

मुंबई ।अरबी समुद्रामध्ये २४ ऑक्टोबरपासून शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या संबंधीचे आदेश एल अँड टी कंपनीला देण्यात आले असून २ हजार ८०० कोटी रुपये खर्चून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. तीन वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जल पूजन करण्यात आले होते.

कसे असेल शिवस्मारक…

शिवस्मारक पूर्णपणे समुद्रात बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देणार असल्याने प्रकल्पाची उंची व सुरक्षा, समुद्रातील खार्‍या पाण्यात आणि आर्द्रतेत स्मारक कसे टिकावू ठरेल इत्यादी बाबींचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीकडे मूळ डिजाईनमध्ये झालेल्या बदलांचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्याने त्याची मान्यता अजून प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने परवानगी मिळण्याची वाट न बघता स्मारकाचे काम सुरु करण्यास सांगितले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्प्यासाठी २ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. दुसर्‍या टप्प्याचे काम व त्याची किंमतनंतर ठरविण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटीपासून ३.६ कि. मी. आणि नरिमन पॉईंटपासून २.६ कि. मी. अंतरावर आहे. हे स्मारक ६.८ हेक्टरवर बांधण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१० मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका”, मुनगंटीवारांचा नाना पटोलेंना टोला

News Desk

बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का! संदीप क्षीरसागरांचे 5 खंदेसमर्थक शिवसेनेत दाखल

News Desk

राज ठाकरें पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही जाणार अयोध्येला…!

News Desk
क्राइम

दादरमधील हत्येचे रहस्य उघडकीस

swarit

मुंबई । गेल्या आठवड्यात दादरच्या फुल मार्केटमध्ये मनोज मोर्ये या इसमाची दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अंगावर गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचे उघडकीस झाले आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केले असून या हत्ये मुख्य सुत्रधार आरोपी राधेकृष्ण खुशवाह यांच्यासह राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाल अशा तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राधेकृष्णने राजेंद्र आणि हेमंतल ५० हजार रुपयांची सुपारी देऊन मनोजची हत्या करण्यास सांगितले होते.

मुंबईत येऊन या दोघांनी मनोजची हत्या केली आणि आरोपी दिल्लीला फरार झाले. मुंबई पोलिसांनी आरोपींना दिल्लीहून अटक केले आहे. मनोजची पत्नी आणि राधेकृष्णा यांची मैत्री होती, ती मैत्री मनोजला मान्य नव्हती म्हणून मनोज पत्नीला घेऊन मुंबईला आला,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यानंतर ही मनोजच्या पत्नीचे आणि राधेकृष्ण एकमेकांच्या संपर्कात होते. राधेकृष्णला मनोजच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम झाले होते. तिला मिळवण्यासाठी त्यांनी मनोज मोर्येची हत्या असल्याचे समजते.

 

Related posts

ट्रेनमध्ये मुलींचे चोरून फोटो काढणारा जेरबंद

News Desk

25 हजारांची लाच घेताना कोतवाल व तलाठी अडकले एसीबीच्या जाळ्यात

Manasi Devkar

ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna