HW News Marathi
महाराष्ट्र

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

मुंबई : अरबी समुद्रात तयार करण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या पुतळ्याची उंची दोन मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा पुतळा २१२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

स्मारकाच्या बांधणीचे काम एलएंडटी कंपनीला देण्यात आले आहे. या स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार आहे. यापूर्वी स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २१० मीटर होती परंतु चीनमध्ये स्प्रिंग टेम्पल येथील बुद्धांच्या पुतळ्याचे स्मारक २०८ मीटर इतक्या उंचीचे होत आहे त्यामुळे महाराजांचे स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असावे म्हणून या स्मारकाची उंची दोन मीटरने वाढविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. तसेच या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी संस्कृतीचे जतन करून विकासकामे करावीत, मुख्यमंत्र्यांचे आदेश!

News Desk

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद

News Desk

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; ८ सुवर्णासह ३० पदकांची कमाई

News Desk