HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर होणार, शिवसेनेकडून हालचाली सुरू

मुंबई | राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून अनेक ठिकाणांची नावं बदलण्याची मागणी होत आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी राज्यात राजकरण सूरू आहे. आता यात मुंबई सेंट्रल स्थानकाचीही भर पडली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्याची मागणी होत आहे. नित्यानंद राय यांनी याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली असून सकारात्मक पत्र मिळाल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

“गेली ६ वर्ष मी आणि माझे शिवसेनेचे सहकारी लोकसभेत पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना अलीकडेच यासंबंधी पत्र पाठवलं होतं. महाविकास आघाडीने विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर केला. मंजूर केल्यानंतर तुमच्याकडून फक्त प्राथमिक मान्यता मिळणं गरजेचं आहे, ती अजून मिळालेली नाही त्यामुळे आपण तातडीने लक्ष घालावं. याचं उत्तर त्यांच्या राज्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी प्रक्रिया सुरु असून अल्पवधीत मान्यता देऊ असं सांगितलं आहे,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. “नाना शंकरशेठ यांची २६ फेब्रुवारीला जयंती असून त्याआधीच झालं तर त्यासारखा आनंदाचा क्षण नाही,” असंही अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी दिली संपाची हाक

Aprna

माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

News Desk

देशात युद्धजन्य परिस्थिती, २ दिवसांचं अधिवेशन बोलवा!

News Desk