मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंसदिवस आणि तासागणिक वाढतचं आहे. मुंबईत आज (११ एप्रिल) १८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामूळे सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ही ११८२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७५ आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या एका दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यातील १० जणांना कोरोनासह इतरही आजार होते.
189 more #COVID19 cases & 11 deaths related to the virus reported in Mumbai today, taking the total number of coronavirus cases in the city to 1,182 & deaths at 75. Of the 11 deaths reported today, 10 had comorbidities & age-related factors: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/MZb3iITEO7
— ANI (@ANI) April 11, 2020
मुंबईत सगळ्यात जास्त धारावी आणि वरळी कोळीवाड्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. आत्तापर्यंत धारावीत ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, धारावीत आता घरोघरी जाऊन स्क्रिनींग करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ५ पथके नेमण्यात आली आहेत. ज्यांच्यात सौम्य जरी लक्षणे आढळली तरी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.