HW News Marathi
महाराष्ट्र

मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचा इशारा

मुंबई | “मी उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून विरोधीपक्ष नेतं देवेंद्र फडणवीस यांचं अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार”, असा इशारा राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतं देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे. विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतं देवेंद्र फडणवीस यांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याजचं उद्या (१० नोव्हेंबर) उघड करणार असल्याचं ही यावेळी सांगितलं.

मलिक म्हणाले, “फडणवीसांनी राईचा परवत केला असून त्यांना माहिती देणार लोक हे कच्चे खेळाडू असल्याचं सूचक विधान करत त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, फडणवीसांनी बॉम्ब फोडण्याचा दावा केला, परंतु त्यांचा फटाका भिजलेला निघाला. मात्र मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार असल्याचे त्यांनी उघड केलं आहे.

फडणवीस पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणालं

मुंबईतील १९९३ बॉम्ब ब्लास्ट आरोपींकडून मलिकांनी कोट्यांवधीच्या जमिनी ३० लाखांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. कुर्ला येथे जमीन खरेदी व्यवहार केला असून बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपींची संपत्ती जप्त केली जाते. मात्र, ही मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी मलिकांनी कवडी मोलाच्या किंमतीत खरेदी केली का ?, असा सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार

फडणवीसांनी मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला होता, असे म्हटलं होतं. यासंबंधित माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार असल्याची त्यांनी माहिती दिली. मलिक पुढे म्हणालं, “तुम्ही आरोप करून माफी मागणार नसाल तर लढाई सुरूच ठेवू. ही फाईल तुम्ही एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही.”

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यंगचित्राच्या कुंचल्यातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्राला फटकारले…

News Desk

मुख्यमंत्र्यांची ‘मी जबाबदार’ घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?- सुधीर मुनगंटीवार

News Desk

“…म्हणून राऊतांना जेवण पचत नाही”, फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

News Desk