HW News Marathi
महाराष्ट्र

“राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच यक्ष प्रश्न”, महापौरांचा टोला

मुंबई । राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. विशेषतः मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२ एप्रिल) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी “काही कठोर नियम करावेच लागणार आहे. शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे” असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सूचक इशारा दिला आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नियम न पाळणाऱ्या राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. मात्र, महापौर पेडणेकर यांचा हा निशाणा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

“खरंतर राजकीय नेत्यांनी लोकांचे प्रबोधन करायचे असते. मात्र, कोणतेही नियम न पाळणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा टोला महापौरांनी विचारला आहे. “कोरोनाच्या संकटात राजकारण करणं योग्य नाही. कोरोनामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे ज्यांच्या जीवावर निवडून येतो, त्यांना चेतवणे योग्य नाही. राजकारण्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये”, असे सांगत नागरिकांचं प्रबोधन करता येईल. पण राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार हाच खरा यक्ष प्रश्न आहे”, असा सवाल महापौरांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्कदेखील वापरत नाही. प्राथमिक पालनच राज ठाकरे करत नाहीत त्यामुळे हा निशाणा अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्यभरात सभा, बैठका, अनेक सार्वजनिक आणि राजकीय, अगदी खाजगी कार्यक्रमांमधून नियमांचे उल्लंघन सर्वपक्षीय असंख्य राजकीय नेत्यांकडून होते, हे देखील तितकेच खरे.

केंद्र सरकारवरही टीका

किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. “केंद्रातून फार मोठी मदत मिळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्यापरीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आणि कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोना रोखण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आपण शून्यावर आणली होती. त्यामुळे आताही आपण त्याच दिशेने काम करत आहोत, त्यासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचे पालन करावे”, असेही आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन 

News Desk

‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय’, क्रांतीने शेअर केली खास पोस्ट

News Desk

अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा! – मंगलप्रभात लोढा

Aprna