HW News Marathi
Covid-19

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात ! शेलारांचा निशाणा

मुंबई | “मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात. इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत”, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत एकीकडे कोरोनाचे आव्हान, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल, शहरांतील रस्ते नाल्यांची झालेली दुरावस्था या काही मुद्द्यांवरून भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. तर यापूर्वी नुकताच मनसेनेही कोव्हीड सेंटर्सवरून मुंबई मनपा, महापौरांवर गंभीर आरोप केले आहे.

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेला धारेवर धरताना असे म्हणतात कि, “महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट…शिवसेनेच्या नगरसेवकांना 535.95 कोटींचा निधी…वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात!इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!” आता आशिष शेलारांच्या या गंभीर आरोपांना शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या मुंबईच्या दुरावस्थेबाबत बोलताना आणि महापालिकेच्या अधिकर्त्यांवर आरोप करताना पुढे शेलार म्हणतात कि, “नालेसफाईचा दावा ११३% चा केला. आता नगरसेवक निधीवर ७३% डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले? मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २,९४० नवे कोरोनाबाधित तर ८५७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ! आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या पार

News Desk

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

News Desk