HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिस समीर वानखेडेंना समन्स धाडण्याची शक्यता

मुंबई | मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. समीर वानखेडे यांनी काहीच दिवसांपूर्वी आपल्यावर पाळत ठेवली जातं असल्याचा आरोप राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केला होता. याच पार्श्वभूमीवर, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडे यांना समन्स पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

समीर वानखेडे यांनी ११ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली होती. वानखेडे यांनी स्वत: हे सर्व पुरावे मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं म्हटलं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन पोलिसांची चौकशी देखील करण्यात आली आहे. तर त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडे यांना समन्स पाठविण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध

२०१५ पासून समीर वानखेडे हे ज्या स्मशानभूमीत आपल्या आईचे अंत्यविधी झाले तिथे नेहमी जातात. यावेळी दोन व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचं समीर वानखेडे यांच्या लक्षात आलं. त्याचसोबत, यावेळचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर, समीर वानखेडे यांनी याबाबत मुंबई पोलिसात तक्रार दाखल करत हे सीसीटीव्ही फुटेज सादर केले. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाच्या रोषाला हे लोक जबाबदार…

News Desk

“तौक्ते वादळही 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”

News Desk

माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, प्रविण दरेकर यांचा पवारांना टोला

News Desk