HW News Marathi
महाराष्ट्र

NIS विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई | आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने काल (११ एप्रिल) किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आता दोन्ही सोमय्या पिता-पुत्रांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे दोघांच्याही अडचणीत वाढ होणार आहे. 

सोमय्यांनी सेव्ह आयएनएस विक्रांत बचावाच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर आयएनएस विक्रांतच्या मुद्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी पैसे गोळा करत मदत निधी उभा केला. यात सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात रक्कम जमा न करता पीएमपी बँकेच्या माध्यमातून मनी लाँन्ड्रिंग केल्या आरोप, राऊतांनी केला. परंतु, या निधीत घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआयतून उघडकीस आले आहे. यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण?

२०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५८ कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला असून ही रक्कम सोमय्यांनी लाटली असंही त्यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हंटलेलं आहे. जनतेकडून गोळा केलेले पैसे सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केले नाहीत व हे पैसे त्यांनी आपल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरले, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

News Desk

“हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

Aprna

नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही!

News Desk