HW News Marathi
देश / विदेश

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई | येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांची ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कपूर यांना ११ माचपर्यंत ईडीची कोठडी मुंबईतील विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने सुनावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल (७ मार्च) रात्री पासून तब्बल ३१ तास चौकशी केल्यानंतर त्यांना आज (८ मार्च) पहाटे ४ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली.

ईडीच्या चौकशीदरम्यान कपूर यांनी अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. यामुळे २०१७ मध्ये राणा यांनी जवळपास ६३५५ कोटींची कर्ज वाटप केल्याचे उघड झाले आहे. कपूर यांना काल दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आले होते.

आरबीआयचे येस बँकेवर निर्बंध

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर ५ मार्चला अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार निर्बंध आणले. यानुसार येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. येस बँकेवरील हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना येस बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू

Aprna

काँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु

News Desk

‘स्वच्छ भारत अभियाना’साठी मुंबई पोलीस करणार पालिकेची मदत

News Desk