HW News Marathi
महाराष्ट्र

मुंडे भगिनींचे समर्थक पंकजा मुंडेंच्या भेटीला, काय होणार बैठकीत?

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळालं. यात खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांच्या जागी डॉ भागवत कराड यांना स्थान मिळालं. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर बीड, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.

अशात, पंकजा मुंडे रविवारी दिल्लीत गेल्या. तिथे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आणि नंतर मोदींची भेट घेतली. एकीकडे दिल्लीत भेटीचं सत्र सुरु असताना महाराष्ट्रात राजीनाम्याचे सत्र सुरुच होते. यामुळे, पंकजा मुंडे यांनी आज (१३ जुलै) मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. त्यामूळे आज या बैठकीत काय होणार? पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार? त्यानंतर राजीनामा सत्र बंद होणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मुंबईत वरळीमध्ये ही बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्य विक्रीसाठी सुट मग वीज बिलात सूट का नाही? भाजपचा सवाल

News Desk

स्वाभिमानी संघटनेकडून राज्यभरातील शेतकरी पुत्रांच्या साथीने एकरकमी FRP हॅशटॅग मोहिम..!

News Desk

मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचंय, नितेश राणेंचा हल्लाबोल

News Desk