HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा महापालिकेचा दावा मात्र उद्या होणार फैसला…

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक हा वाद काही गेल्या सुटता सूटत नाहीये, वारंवार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पत्रकार परिषदांच्या नवनवीन खुलासे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशातच आता एनसीबीचे चे संचालक समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा आता महापालिकेने केला आहे. महापालिकेने तशी कागदपत्रे कोर्टात सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पालिकेच्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल शंका उपस्थित केली होती. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी वानखेडेंचे जात प्रमाणपत्रं आणि निकाहनाम्याची कॉपीही दिली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं, आणि या सगळ्या नंतर मात्र आता महापालिकेने दावा केलाय की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे.

उद्या कोर्टात काय होणार

या संदर्भात महापालिकेकडूनही वानखेडेंबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली होती. वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. मात्र, या वृत्ताला पालिकेने दुजोरा दिला नसला तरी पालिकेने कोर्टात कागदपत्रं सादर केल्याने उद्या कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांचा दावा

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवले. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 2015 पासून या लोकांनी त्यांची ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबुक पेजवर दाऊद वानखेडे असंच नाव होतं. नंतर ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांचे नातेवाईकच मुस्लिम आहेत असाही दावा नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : राज्यातील ‘ही’ चार शहरे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

swarit

भाजपने यावर ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही शिवसेनेकडून भाजपचा समाचार

News Desk

“नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करणाऱ्या, एक आमदार भाळला आणि…”; शिवसेनेने फटकारले

Manasi Devkar