HW News Marathi
Covid-19

Murlidhar Mohol HW Exclusive : दाट लोकवस्तीमधील लोकांचे स्थलांतर करून कोरोनाचा संसर्ग कमी करणार !

पुणे | महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसा आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रामाणात पाहायला मिळत असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. यामुळे पुणे महापालिकेकडून शासकीय शाळा, मंगलकार्यालय, हॉटेल या सर्व वास्तू ताब्यात घेण्यात येणार आहे. या ठिकाणी दाट लोकवस्ती असलेल्या भागातील लोकांनाचे सहकुटुंब यांचे स्थलांतर करणार असल्याचा उपाय पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

पुणे महानगर पालिका हीदाट लोकवस्तीमधील लोकांचे स्थलांतर करत, या प्रश्वारव बोलतातना म्हणाले की, पुण्याचा जो पुगो भागात महापालिकेचे काम ज्या यंत्रणेतून चालते. ते वॉर्ड ऑफिसच्या स्थरावर चालेत. पुगो भागातील १५ पैकी ५ वॉर्ड ऑफिस असे आहेत की ते पूर्णपणे रेड झोनमध्ये येतात. या वॉर्डमध्ये साधारण दहा लाख लोकसंख्या आहे. यातील साडेतीन लाख लोकसंख्या ही केवळ या झोपडपट्टीमध्ये आहे. दाट लोकवस्ती असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला, असे पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर एक उपाय पालिकेने करणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले की, या दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणीच्या जवळपास ज्याकाही पालिकेच्या वास्तू असतील म्हणजे पालिकेच्या शाळा, मंगलकार्यालय, हॉटेल या सर्व वास्तू ताब्यात घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी दाट लोकवस्तीतील काही कुटुंबसह लोकांचे स्थलांतर करणार आहोत. तर ७० हजार झोपड्यामधील साडेतील लाखपैकी जर आपल्याला यश आले. तरी १५ ते २० हजार घरातील लोकांनाचे आपण स्थलांतरीत करू शकलो, तर खऱ्या आर्थाने गर्दी कमी होईल, सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाळले जाईल, असा विश्वास पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, “कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. दाट लोकवस्तीली लोकांचे स्थलांतरी करणे हा इतर जे उपाय केले जात आहेत. त्यापैकीच हा एक उपाय असून त्यावर काम करण्यास सुरुवात, ” केल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी सांगतले आहे.

पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही पाठवण्याची सोय

गेल्या काही दिवसांपासून पुण्या शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते, या प्रश्वावर उत्तर पुण्याचे महापौर मुरली मोहोळ म्हणाले, गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहरात जे विद्यार्थ्यी शिक्षणासाठी आले आहेत. लॉकडाऊनमुळे आजही पुण्यात आडकलेत. त्या विद्यार्थ्यीची राहाण्याची खाण्याची सोय करणे हा अतरिक्त ताण आपल्या व्यवस्थेवर आहेच. या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याचे वेध लागले आहे. यावेळी तात्काळ अजित पवार यांनी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, संबंधित विद्यार्थ्यी ज्या जिल्ह्यातून आले असतील. त्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करा, त्यांची कार्यपद्धती निश्चित करावी. जेणे करून हे हजारो विद्यार्थ्यी पुन्हा आपल्या गावी जातील. यामुळे पुणे शहरातील विद्यार्थ्यांचा एक मोठा व्यवस्था करण्याचा विषय थांबेल. त्या अनुषघाने मग जेवण देणे, किचन चालवणे, मग त्यात माणसे वाढणे यामुळे अजून संसर्गाचा धोका वाढतो. या गोष्टीना देखील निश्चितपणे आळा बसेल, असे पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीळा दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे.

पुण्यात १४ हजार क्वारंटाईन बेड तयार

स्व:ताहून काही लोक पुढे आले आहेत. त्यांनी क्वारंटाईनसाठी हॉटेल, खाजगी किंवा सरकारी शिक्षण संस्था यांचे वसतीगृह आणि इमारती आहे. जवळपास या सर्वांच्या माध्यमातून पुण्यात १४ हजार क्वारंटाईन बेडची तयारी केल्याची माहिती पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. गरज भासल्यास अजून काही लोकांशी देखील संपर्क करू, असेही त्यांनी सांगितले आहे.

केंद्र आणि राज्या सरकारची मोठी मदत

कोरोनाहे जग आणि आपल्या देशावर आलेले हे सर्वात मोठे संकट आहे. देशातील केंद्र सरकार आणि राज्यातील राज्य सरकार तर महापालिका म्हणून काम करत असताना, पुणे शहर म्हणून काम करत असताना. केंद्र आणि राज्य सरकारचे आम्हला यात कामात पूर्ण सहकार्य आहे. चांगल्या पद्धतीने आमचा त्यांच्याशी समन्वय आहे. कोरोनासारखे इतके मोठे आवाहन असताना काम अत्यंत चांगले आणि व्यवस्थित चालू आहे, याचा विशेष उल्लेख पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या मुलाखतीत केला आहे.

पुण्याचे महापौर मुरली मोहोळ यांची संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झाली नाही! – अजित पवार

Aprna

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढव, अजित पवारांचे आदेश

News Desk

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल

News Desk