HW News Marathi
Covid-19

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण ८ मृत्यू

मुंबई | देशसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढत होत आहे. यावेळी आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. या कोरोनामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत मुंबईत ५ तर मुंबईनंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे ८ पोलिसांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुरलीधर शंकर वाघमारे यांच्या निधनाची माहिती मिळाली आहे. राज्यातील मुंबईनंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्यभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा २४ हजारांवर पोहोचला आहे व त्यात पोलिसांची संख्या १ हजार २५ वर जाऊन पोहोचली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या चोवीस तासांतच २२५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात १०६ अधिकारी आहेत.

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू आहेत. या पाश्वभूमीवर ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली. या पोलीस कर्मचाऱ्यांना २७ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk

राज्य सरकारने ‘या’ ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मुंडेंनी मानले आभार

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी आज संवाद साधणार

News Desk