HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या भाषणाचा विपर्यास झाला! प्रसाद लाड यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई। भारतीय जनता पार्टीचा दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. तर, शिवसेना नेते सचिन आहिर यांनी शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. फुटपाथवर येऊन दाखवावं त्याना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांची त्या वक्तव्यावर पलटी

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांमधून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही. माझं स्पष्ट म्हणनं होतं की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे.माझं हे स्पष्टीकरण आहे, मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड काय म्हणाले होते ?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

News Desk

महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!

News Desk

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सुरुंग, १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन!

News Desk