मुंबई । राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची जोरदार चर्चा आहे. पक्षातील अनेक मोठी नावे यासाठी चर्चेत असल्याने नेमके प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत मोठी उत्सुकता असताना विधानसभेचे सभापती आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव अग्रस्थानी आहे. असे असतानाच आता नाना पटोले यांनी आज (३ फेब्रुवारी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी नाना पटोले यांनी त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या भेटीतील तपशील जरी अद्याप समजू शकलेला नसला तरीही ही भेट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाबाबत झाली असल्याचा अंदाज असून याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता आहे.
….आणि सुशीलकुमार शिंदेंनी होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव घेतले होते
सोलापूरचे युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी २८ जानेवारी रोजी मुंबईत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणादरम्यान बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी होणारे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव घेतले. मात्र, त्यानंतर तातडीने वाक्य फिरून सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या वक्तव्यावर सावरसारव देखील केली.
यावेळी, सुशीलकुमार शिंदे हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची वाटचाल कोणत्या पद्धतीने करणे आवश्यक आहे याबाबत बोलत असताना अवधानाने “होणारे अध्यक्ष पटोले”असा सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मात्र, ही गोष्ट लक्षात येताच तातडीने त्याबाबत सारवासारव करत सुशीलकुमार शिंदे यांनी विषय बदलल्याचे देखील पाहायला मिळाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.