HW News Marathi
महाराष्ट्र

‘काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली’, नाना पटोलेंचा पलटवार

मुंबई | राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस मध्ये मतभेद वाढू लागले आहेत. काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. पवारांच्या या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या. त्यांनीच जमीन चोरली, डाका टाकला, अशा शब्दात नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांवर हल्ला चढवला आहे.

जमीन दिली त्यांनीच डाका मारला

नाना पटोले यांनी शरद पवारांना साडेत्तोड उत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असं ही ते बोले आहेत.

काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली आहे.

पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जमीनदारीवरून सल्ला दिला आहे. मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३ हजार कोटींची बेकायदेशीर उलाढाल करणाऱ्या मुंबईतील टॅंकर माफियांवर कारवाई करा! – आशिष शेलार

Aprna

NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल!

News Desk

वारकरी चिडले, उध्दव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहा!

News Desk