HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला – नाना पटोले

नागपूर | ””आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. मात्र, आता सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे.

“या देशाला काँग्रेसच्या विचाराने स्वातंत्र्य मिळाले. आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा कार्यकाळ खूप चालला. मात्र, यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार्ज काढण्यासाठीच मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या वेगवेगळ्या धोरणांवर सडकून टीका केली. “भाजपने सुशांतसिंग प्रकरणात राज्य सरकारला तीन महिने बदनाम केलं. यात भाजपचा एक मोठा नेता अडकला आहे,” असा आरोप पटोले यांनी केला. तसेच, भाजपचा नेता अडकल्यामुळेच सीबीआयने अहवाल दाबून ठेवला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावित्रीच्या लेकी रोज बळी पडतायेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद – चित्रा वाघ

News Desk

नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार!

News Desk

चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

News Desk