HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड महापालिका निवडणूकीत समृद्धी घोटाळ्याचे 300 कोटी भाजपने वापरले- नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई – समृद्धी महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित असलेले आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांनी नांदेड महापालिका निवडणूकीसाठी भाजपला तब्बल 300 कोटी देवू केल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मोपलवार यांची सध्या समृद्धी महामार्ग भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे.

ही चौकशी नांदेड महापालिकेची भाजपची धुरा सांभाळणा-या प्रतापराव चिखलिकरांचे नातेवाईक आयपीएस ऑफीसर प्रवीण पडवळ करत आहेत. त्याच्या माध्यमातून मोपलवारांना क्लिनचिट देण्याची व्यवस्था भाजपने केली आहे. त्या बदल्यात 300 कोटी रूपये मोपलवारांनी नांदेड मनपा निवडणूकीसाठी दिल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे पडवळ यांना चौकशी समितीतून हटवून तटस्थ पणे चौकशी केली जावी अशी मागणी मलिक यांनी केली.

नांदेड महापालिका जिंकण्यासाठी नैतिकता सोडून भाजपने निवडणूक लढवली. फोडफोडी पासून पैसा आणि सत्तेचा गैर वापर भाजपनं केला असा आरोपही त्यांनी केला. तरीही त्यांना जनतेने नाकारले. ही निवडणूक लिटमस टेस्ट होती. भाजपचा उधळलेला अश्वमेध नांदेड मध्ये लंगडा झाल्याची टिका मलिक यांनी केली. नांदेडच्या जनतेने एक हाती मतदान कांग्रेसला केले. या निवडणूकी वरून परिस्थिती बदलत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर! – नाना पटोले

Aprna

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

swarit

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारातून शिवसेनेने दिली उमेदवारी

News Desk