HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे सहकुटुंब शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी  ब्रीच कँडीत

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आजच (३१ मार्च) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.

पक्ष वेगवेगळे असले, वैचारिक भूमिका भिन्न असल्या, तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळते. कोणे एके काळी आघाडीमध्ये शरद पवारांसोबत राहिलेले नारायण राणे हीच संस्कृती जपताना दिसत आहेत. त्यामुळेच पवारांच्या शस्त्रक्रियेनंतर राणेंनी सहकुटुंब जाऊन त्यांची विचारपूस केली.

शरद पवार ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. दरम्यान, रोहित पवार यांनीही शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत पाटील आधी झोपेतून जागे व्हा”, संजय राऊतांची विखारी टीका!

News Desk

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna