HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा, संजय राऊतांना अग्रलेखावरून राणेंचं सणसणीत उत्तर!

मुंबई। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जन आशिर्वाद यात्रेत आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अटकेनंतर जामिन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच निशाणा साधला आहे. राऊत यांनी आपल्या अग्रलेखात राणे नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा असे म्हटले आहे. यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे संपादक म्हणून लायकीचे नाहीत. जे फक्त उद्धव ठाकरे खूश होतील इतकेच लिहितात. राऊतांना 17 तारखेनंतर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. तसेच मी गँगस्टर होतो तर मला मुख्यमंत्री कसं केलं? म्हणजे शिवसेनेत सर्व गँगस्टरच आहेत का? असे सवालही राणे यांनी केले आहेत.

पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील

चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला.

योगींचं थोबाड फोडण्याची भाषा योग्य होती का ? नारायण राणेंचा सवाल

पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्री सण माहित नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. असं राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंच्या जाण्याने पक्षाला खिंडार पडणार नाही –  गिरीश महाजन

News Desk

ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? संजय राऊतांचा सवाल

News Desk

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk