HW News Marathi
देश / विदेश

‘ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार’ – नारायण राणे

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नेहमीच विरोधी पक्षा विषयी बोलत असतात. ‘सत्तारुढ पक्षाने म्हणजेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं कार्य काहीही नसल्यामुळे देऊ शकत नाहीत. त्यामुळे माहिती द्यावी तर कुणाची द्यावी? त्यामुळे वाईट सवय असलेल्या संजय राऊत भाजपवर हेतुपरस्पर टीका करतात. त्यांच्या पक्षाचं सरकार असून लोकांसाठी सांगण्यासाठी कोणतीही विकासकामं नाहीत. त्यामुळेच भाजपला लक्ष केलं जातेय’, असा टोला नारायण राणेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

भाजपमध्ये राज्याच्या अध्यक्ष बदलण्यावर कोणतीही चर्चा नाही

भाजप प्रदेशाध्यक्षाचं पद चंद्रकांत पाटलांकडून काढून घेण्याची चर्चा सध्या रंगात आहेत. यावर नारायण राणेंनी त्यांचं मत सांगितलं आहे. “भाजपमध्ये राज्याच्या अध्यक्ष बदलण्यावर कोणतीही चर्चा नाही. अध्यक्षपदाबाबत चर्चा तुम्ही पत्राकारच काढत आहात. नावं तुम्हीच काढता. दादा दिल्लीत माझं अभिनंदन करण्यासाठी आले आहेत. आम्ही एकाच पक्षाचे असल्यामुळे ते दिल्लीमध्ये अभिनंदन करण्यासाठी आले आहेत. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही. यामध्ये कोणतेही राजकारण नाही”, असे राणे म्हणाले आहेत.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk

मध्य प्रदेशातील ‘उलट्या वराती’त नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेले बरे!

swarit

BiharElection 2020 : शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्रीही रिंगणात उतरणार

News Desk