HW News Marathi
देश / विदेश

“…याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं जाहीर ‘आभार’ पत्र

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार अलीकडेच दिल्ली इथं पार पडला. या कॅबिनेट विस्तारात मोदींनी अनेक अनपेक्षित राजीनामे घेतले. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. महाराष्ट्रातील ४ जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यात भाजपचे नेते नारायण राणे यांची वर्णी लागली आहे.

भाजपा खासदार नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लघु, सुक्ष्म उद्योग विभागाचा कारभार सोपवला आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

नारायण राणेंचं आभार पत्र

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला मिळाली. केंद्रीय मंत्रिपदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यापर्यंत सर्वांनी मला फोन करून व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या.

काही जणांनी देवाजवळ प्रार्थना केल्या, आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळत राहो. ही नम्र अपेक्षा, आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एक वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य यांचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो! भविष्यात प्रत्यक्ष भेटू आणि बोलू असं नारायण राणेंनी पत्रात म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna

‘अब्बा जान’ वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना म्हणाले….!

News Desk