HW News Marathi
महाराष्ट्र

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना गप्प केलं

चिपळूण | महाराष्ट्रात आलेल्या पुराचा आढावा घेण्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे चिपळूण येथे आले आहेत. नुकताच त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला होता. यावेळी नारायण राणे हे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मात्र यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं आहे. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा मात्र रंगली आहे.

नारायण राणे हे प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांब रे तू मध्ये बोलू नको असं म्हणत दरेकरांना थांबवलं असं दिसत आहे.

“तो सीएम बीएम गेला उडत”, नारायण राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधीही आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले होते की, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा,” असं राणे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- प्रविण दरेकर

News Desk

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

News Desk

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk