HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंची तब्येत बिघडली!

रत्नागिरी | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. या वक्तव्यामुळे राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या प्रकृतीबाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत आहे. राणे लवकरच रुग्णालयाच दाखल होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.

प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती

नारायण राणे यांना अटक करण्यात अली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पण राणेसाहेबांना जेवण करु द्या

तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा, संजय राऊतांना अग्रलेखावरून राणेंचं सणसणीत उत्तर!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला – नाना पटोले

News Desk

“बेळगावमध्ये बऱ्याच वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु, आता इथं माकडांचं काम नाही”

News Desk